साहित्य संमेलनाला कोणी आपल्या सोयीसाठी व स्वार्थासाठी वापरू पाहत असेल, चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न करत असेल तर भिडेला बळी न पडता त्याला अटकाव केला पाहिजे
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ हा मराठी समाजाच्या आस्थेचा व आनंदाचा सर्वोच्च सोहळा आहे. कालौघात त्यात गरजेनुसार इष्ट ते बदल झाले; समाजाच्या गरजेनुसार भविष्यातही होत राहतील; ते आवश्यकही आहेत. पण या सोहळ्याला कोणी आपल्या सोयीसाठी व स्वार्थासाठी वापरू पाहत असेल, चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न करत असेल तर भिडेला बळी न पडता त्याला अटकाव केला पाहिजे.......